Thursday, 13 August 2015

These are the thoughts I had shared on Facebook before the monsoon session of the parliament....BJP & Sushama are not expected to be seen in any sorts of doubts & controversies. If they have done something wrong or unethical,then the act can not become subsided or receded by pointing out towards similar acts of the others committed in past. We know that those people are unworthy, that's why you have been chosen to rule! You have to be different......

......Women "power" has always troubled the BJP in the recent past. Remember the Vajpayee led NDA government about 15 years ago . How Mr. Vajpayee's govt. was taken to task by the then mighty leaders like Mamata, Jaylalitta & Mayavati & finally succumbing to their pressure.

Now it’s Namo’s turn, it appears. The way the demonstrations against the Sushma, Vasundhara’s acts in Lalit Modi’s favour & Smruti’s fake degree scandal are being staged by the opposition; the media adding fuel to the fire every now & then; & AAP-like parties trying to bite off from every possible side, it’s quite clear what the fate of the parliament’s monsoon session would be.

Whatever might be the truth about Sushma Swaraj’s involvement in favouring the absconding wanted criminal, Lalit Modi. The act of hers may or may not be wrong by the word of law. But as far as the spirit of the law is concerned, she has definitely hurt & violated the spirit of the law by endorsing his request to the British authorities.

This is completely unacceptable & unexpected from the minister with clean image & from the party with a difference. For, Caesar's wife must be above suspicion!!!!


Friday, 7 August 2015

 सिंहस्थ कुंभमेळ्याचा बाजार गरम आहे.देशाच्या काना-कोपर्‍यातून अनेक आखाडे,मठ यांचे साधू-संत-महंत जथ्या-जथ्याने नाशकात दाखल होतायत. साधूग्राम मध्ये गजबज दिसू लागलिय. शासन-प्रशासन कमरेत लव-लवून धर्माचार्यांच्या खिदमतीत राबतेय. साधूंच्या-महंतांच्या सेवेत,तैनातीत कसलीही कमतरता भासू नये ह्याची पदोपदी काळजी घेतली जाताना दिसतेय.  प्रथा-परंपरेच्या काटेकोर अंमलबजावणीतीही त्रुटी राहू नये, संतांचा रोष ओढवू नये यासाठी आटापिटा केला जातोय. साधू-संन्याशांची एवढी काळजी,इतकी बडदास्त पेशवाईतही ठेवली गेली नसेल!
कुंभमेळा व्हावा कि न व्हावा; हा खर्च आवश्यक की अनाठायी या खोलात मला जायचं नाही. एकच वाटतं, प्रामाणिक करदात्यांचा एवढा पैसा, शासन यंत्रणेची एवढी उर्जा-वेळ-स्रोत जर दरिद्री-नारायणाच्या कल्याणासाठी-उत्थानासाठी वापरले गेले, तर अशा दहा कुंभमेळ्यांच्या पुण्यापासून मिळणार्‍या फळापेक्षा उत्तम फळ देशाला प्राप्त होइल. पण दिसत असलेल्या ऐहिक प्रगतीपेक्षा न दिसणार्‍या कल्पित पारलौकिक   पुण्यप्राप्तीची आस असणार्‍या  मानसिकतेस हे पटावे कसे?
 संत-सज्जनांच्या सेवेकरता केलेला खर्च सत्कारणी असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. पण जे चित्र दिसतं ते पाहून संभ्रम निर्माण होतो. अनेक साधू-अनेक तर्‍हा ! अनेक वैशिष्ट्ये. कित्येकांकडे पाहून त्यांना  साधू-सज्जन म्हणणे जीवावर येते. मुळात “साधू” ह्या शब्दाची व्याख्या बघितली तर ह्यापैकी किती महाभाग त्या कसोटीला उतरतील,याची शंकाच आहे. “साधू” म्हणजे “सहा-धू”! काम,क्रोध,लोभ,मोह, मद,मत्सर हे सहा शत्रू ज्याने जिंकले,तो साधू !!
आपल्या सरबराईत थोडे कमी पडले, थोडे मनासारखे झाले नाही तर प्रचंड आकांडतांडव करणारे मुख्य मुख्य धर्माचार्य, त्यांचे सहकारी हे क्रोध जिंकलेले साधू? शैव-वैष्णव एकमेकांकडे ज्या “प्रेमाने” बघतात तो प्रकार साधुत्वाचा ? अंगाला राख फासली असून मोबाईल फोन, लॅपटॉप, चिलीम, (तीत कुठला पदार्थ असतो ते सोडा!) यांची कामना असणारे ते मोह जिंकलेले साधू?  एकाच पंथाच्या निरनिराळ्या आखाड्यांमध्ये असतो तो मत्सररहित व्यवहार ? साधूग्राम मध्ये मोक्याची जागा मिळावी ही इच्छा बाळगणारे ते लोभ-मुक्त साधू?  आसाराम बापू- राधेमां वगैरेंसारखे लोक म्हणजे काम-विजयी साधू-साध्वी?

खरे-खुरे संत-सत्पुरुष आणि तथाकथित साधू यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. साईबाबा कधी कुठल्या कुंभमेळ्यात गेल्याचे ऐकले नाही. गजानन महाराजंनी कुठल्या पर्वणीत गंगा-स्नान केल्या्चा उल्लेख नाही. स्वामी-समर्थ, गोंदवलेकर महाराज कधी आपला शिष्यपरिवार घेउन पुण्य संपादनार्थ कुंभात सहभागी झाल्याचा दाखला नाही. खरीखुरी पुण्यप्राप्ती लोककल्याणात नसून कर्मकांडात आहे हे कदाचित त्यांना माहित नसावं!!

Thursday, 6 August 2015

                                माध्यमांची प्रगल्भता
 देशहितविरोधी,परधार्जिण्या आणि फक्त TRP मध्येच रस असणार्‍या खाजगी प्रसार-माध्यमांचा चांगल्यापेक्षा सनसनाटी पणा कडेच ओढा असतो; मग ती बातमी राष्ट्रविघातक वा वाईट प्रवृतींच्या उदात्तीकरणाची का असेना. याकूबची फाशी, त्याची अंत्ययात्रा, त्याच्या नातेवाईकांचा कळवळा, यात अब्दुल कलामांचा धीरगंभीर अंत्यविधी पार बाजूला टाकला. संजीव चतुर्वेदी आणि अंशु गुप्ता या भारतीयांना आशियाई नोबेल समजला जाणारा रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला ह्याची कुठे दखलही घेतली गेलेली दिसली नाही.
पाकिस्तानी दहशतवादी पकडला याचं चर्वितचर्वण कालपासून करताना मोझांबिकचे राष्ट्रपती आपल्या दौर्‍यावर आले आहेत हे माध्यमांच्या गावीही नाही.  ह्याच ठिकाणी जर अमेरिका/ UK चे नेता आले असते तर २४ तास ते TV वर दिसले असते.  तिसर्‍या जगातल्या देशांचेही जागतिक राजकारणात महत्व आहे याची प्रगल्भ जाणिव माध्यमांना नाही.
 आताच मह्त्वाचा नागा-करार केंद्राने पूर्ण केलाय. ह्याचं ऐतिहासिक महत्व कल्पनातीत आहे. देशाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर अतिशय दूरगामी परिणाम करणारा हा करार आहे. किती माध्यमांनी ह्याची पुरेशी आणि गांभिर्याने दखल घेतली? आणि त्याचवेळी दुसरीकडे छोटा शकीलचं संभाषण परत परत दाखवलं जातं, हेच माध्यमांची maturity किती तकलादू आहे ते अधोरेखित करतं.
देशाच्या एकंदरीत परिपक्वतेचं प्रतिबिंब हे त्याच्या माध्यमांच्या आरशात जग बघत असतं. त्या दृष्टीने आपण जगाला कसे दिसत असू,याची कल्पना केलेली बरी.